जेरुसलेम ज्वालाग्रही पेटी आहे… तिचा कधीही भडका उडू शकतो...
‘पावित्र्यावर कुणाची मक्तेदारी नाही. जेरुसलेम ही एक नगरीच नाही, तर ती एक ज्वाला आहे. ज्वालेची विभागणी करता येते का?’ ती ज्वाला असो किंवा नसो, पण कुणालातरी जेरुसलेमचं सार्वभौमत्व राखावं लागेल. वेगवेगळे प्रस्ताव मुसलमानांना वरचा भाग देतात आणि खालची भुयारं आणि कालवे (अर्थातच पायाचा भाग) इस्राइलला देतात. भूगर्भावर कुणाची मालकी आहे? जमिनीवर कुणाची मालकी आहे? आकाशावर कुणाची मालकी आहे?.......